महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर २०२३) : २२ नोव्हेंबर रोजी वायू प्रदूषण नियंत्रण पथकाने केलेल्या कारवाईत एकाच दिवसात २ लाख १७ हजार ७५३ इतका दंड वसूल करण्यात आला.
अ प्रभागातील वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने हॉटेल आणि बेकरी व्यवसायांकडून १० हजार रूपये तर इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत ८ हजार ५९३ रुपये असा एकूण मिळून १८ हजार ५९३ रुपये दंड वसूल करण्यात आला.
ब प्रभागामार्फत ४१ हजार १६० रुपये दंड वसुल करण्यात आला असून ७ ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने केलेल्या पाहणीत २ ठिकाणी वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे.
क प्रभागाच्या पथकाच्या वतीने १० ठिकाणांना भेट देण्यात आली त्यातील ३ ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून एकूण १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
इ प्रभागाच्या वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने एकूण १० हजार दंड वसूल करण्यात आला. पथकाने ३ ठिकाणांना नोटीस बजावली असून २ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
फ प्रभागामार्फत एकूण ३५ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी ९ जणांवर कारवाई करण्यात आली असून एकूण १ लाख २५ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली आहे.
ग प्रभागाच्या वतीने काल एकूण ३ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आणि १५ ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यातील ६ ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
ह प्रभाग वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने एकूण ५ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. पथकाने ४ ठिकाणी पाहणी केली आणि एका ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…