कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांची … लहान मुलांसाठी अशी असणार चाईल्ड हेल्पलाईन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . २८ जून २०२१) : कोरोनाच्या संभाव्य तिस – या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून हेल्पलाईन चालविणा – या शालेय विद्यार्थ्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास आजपासून सुरुवात झाली . प्रशिक्षण शिबिरात विविध शाळांच्या निवडक विद्यार्थ्यांसह शिक्षक सहभागी होते .

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय अधिकारी ख्रिस्टोफर झेवियर , शिक्षणाधिकारी पराग मुंढे , उपअभियंता वैशाली ननावरे , जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहे . संभाव्य तिस – या लाटेला सामोर जात असताना विविध पातळीवर महापालिका पूर्वतयारी करीत आहे . तिस – या लाटेमध्ये लहान मुले कोरोनाच्या संसर्गामध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

या पार्श्वभूमीवर अधिक सजगतेने महापालिकेने पूर्वतयारी सुरु केली आहे . कोरोना संदर्भात विविध माहिती तसेच प्रश्नांची उत्तरे सुलभतेने लहान मुलांना मिळावीत यासाठी महापालिकेच्या वतीने चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे . चाईल्ड हेल्पलाईनचा मुख्य हेतू लहान मुलांमधील कोरोनाबाबतची भीती दूर करणे हा आहे . हेल्पलाईनचे वैशिष्ट्य म्हणजे ही हेल्पलाईन शालेय विद्यार्थ्यांकडून चालविली जाईल .

यासाठी महापालिका हद्दीतील विविध शाळांमधील इयता ७ वी ते १० वी मधील काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे . या विद्यार्थांना चाईल्ड हेल्पलाईन संदर्भात तसेच कोरोना आजाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना कशाप्रकारे उत्तरे द्यावीत याबाबात प्रशिक्षणात माहिती देण्यात आली . महापालिकेमार्फत चाईल्ड हेल्पलाईनच्या अनुषंगाने प्रश्नावली तयार करण्यात आली असून हेल्पलाईन चालविणा – या शालेय विद्यार्थ्यांना कोरोना आजार व उपचार याबाबत सविस्तर प्रशिक्षण व माहिती दिली जात आहे . या हेल्पलाईनमध्ये वैद्यकीय अधिका – यांचे सहाय्य देखील राहणार आहे . शिवाय शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन देखील घेतले जाणार आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 hour ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 hour ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago