महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. ०२ मार्च २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि त्यांची मुलीगी ऐश्वर्या हिने लक्ष्मण जगतापांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी माय-लेकींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थितांनी ‘अमर रहे, अमर रहे, “लक्ष्मण जगताप अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.
अश्विनी जगताप लक्ष्मण जगताप यांनी अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर डोकं ठेवलं. त्यावेळी त्या भावनिक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झालं. यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी जगताप यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीच्या मृत्यूच्या दुःखाने अश्विनी जगताप यांच्या डोळ्यात पाणी आले. अश्विनी जगताप यांच्यानंतर त्यांच्या मुलीनेही स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन वडिलांना आदरांजली वाहिली. मात्र, आईनंतर तिलाही भावना अनावर झाल्या आणि तिलाही अश्रू अनावर झाले. यानंतर महिला कार्यकर्त्यांनी तिलाही सावरलं.
अश्विनी जगताप म्हणाल्या, “ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. “गड आला, पण सिंह गेला”… लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं, त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे.
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…