अनलॉकनंतर नगरसेवक ‘हर्षल ढोरे’ यांनी मोरुची मावशी नाटकाच्या रूपाने सांगवीकरांना दिली सांस्कृतिक मेजवानी … नाटकास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

महाराष्ट्र 14 न्यूज : अनलॉकनंतर मंगळवारी (ता.१६) सांगवीकरांना नाटकांची तिसरी घंटा ऐकण्याची संधी मोरूची मावशी या नाटकाच्या रूपाने ‘ह’ प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे यांनी दिली. निमित्त होते या भागाचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे , आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्यावर प्रेम असणाऱ्या त्यांच्या अनेक चाहत्यांनी केले आहे.

सांगवीतील गजानन महाराज मंदिरा समोरील मोकळ्या मैदानात बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने मोरूची मावशी या आचार्य अत्रे लिखित अभिनेता भरत जाधव यांच्या नाटकाच्या या प्रयोगाचे उद्घाटन पिंपरी चिंचवडच्या महापौर व या भागाच्या नगरसेविका माई ढोरे व जयश्री विजूशेठ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजूशेठ जगताप, शशिकांत कदम, उषा मुंढे, अंबरनाथ कांबळे, शारदा सोनवणे, संतोष कांबळे, सागर आंघोळकर, महेश जगताप,उद्धव कवडे, संजय मराठे, संतोष ढोरे, दिलीप तनपुरे, धनंजय ढोरे, नितीन खोदडे, जवाहर ढोरे, पत्रकार संतोष महामुनी आणि नाट्यप्रेमी रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडकरांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या खंडानंतरही ते आपणास पुन्हा अनुभवण्यास मिळत असल्याचे मत मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते भरत जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

नाटकास सांगवीकरांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद..

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गत नऊ ते दहा महिन्यांपासून चित्रपट, नाटकांच्या प्रयोगांना राज्य शासनाची परवानगी नसल्याचे सिनेमा व व्यावसायिक नाटकांचे प्रयोग बंदच होते. त्यामुळे प्रेक्षकांना मोठी प्रतीक्षा करावी लागली, मात्र, आजच्या मोरूच्या मावशीच्या रूपाने ती पूर्ण झाल्याचे दिसत होते. नाटकास चहात्यांनी इतका प्रतिसाद दिला की लोकांना पाय ठेवायला जागा न्हवती मैदान अगदी तुडुंब भरले होते. काही तासांतच हा प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याने, प्रेक्षकांना मनोरंजनाची किती गरज होती, हे आज लक्षात आले.शासनाने पन्नास टक्के उपस्थितीच्या अटींवर सिनेमा व नाटकांच्या प्रयोगांना परवानगी दिली असल्याने नाट्यगृहात जाऊन नाटक पाहणं अवघड झालं आहे, असे नाट्यप्रेमी चे म्हणणे आहे, परंतु आमच्या हर्षल भाऊंमुळे आम्हाला आज आमच्या भागात नाटक पाहण्याचा योग आल्याने आम्हाला आनंद झाल्याचे महिला वर्ग म्हणत होता. नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे यावेळी दिसून आले. तसेच सर्वच प्रेक्षकांनी नाटकास मनापासून दाद दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago