न्यू सिटी प्राईड स्कूल मध्ये खूप दिवसांनी विद्यार्थ्यांची किलबिल … मुखध्यापिका यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेत, नियमांचे केले पालन!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून सर्व शाळा बंद ठेवाव्या लागल्या. वर्ष संपले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले. तरीही शाळा बंदच होत्या. ऑनलाइन वर्ग सुरु झाले . कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार आज शाळा सुरु करण्यासाठी सॅनिटाईजर,मास्क व आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सरकारनियमानुसार सर्व खबरदारी व उपाययोजनाची पुर्तता केलेली आहे . सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी (RT-PCR) करण्यात आलेली आहे .

प्रत्येक विद्यार्थी शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शरीराचे तापमान मशीन द्वारे करण्यात आले. तसेच सर्व वर्ग खोल्या, ऑफिस व परिसराची निर्जंतुकीकरण करण्यात आले . सोशल डिस्टंसिंग चे पालन करून वर्गात २०-२५ विद्यार्थी बसविण्यात आले.

“घरात ७-८ महिन्यापासून बसून असल्यामुळे मुलांची उत्सुकता वाढली होती.सगळे मित्र ,शिक्षक खूप दिवसांनी कधी भेटतील असे झाले होते . ऑनलाईन शिक्षण घेताना ज्या काही अडचणी आल्या होत्या ते आता शाळेत आल्यानंतर कमी होतील व चांगले दर्जेचे शिक्षण मिळणार आहे.

 

पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना कोणतीही खंत बाळगू नये . शाळांनाही मुलांची काळजी आहे” असे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पलता डीक्रूझ म्हणाल्या.

सर्व मुलांचे गुलाबाचे फुल देऊन सकाळी स्वागत करण्यात आले. व सर्व मुलांना, शिक्षकांना ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सॅनिटाईजर व मास्क संस्थेतर्फे देण्यात आले .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago