महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १३ सप्टेंबर) : राज्यामध्ये अनेक सरकारी गोष्टी या खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी दिल्या जात आहे. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या लाखो तरुणांच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या कंत्राटी भरतीच्या निर्णायाविरोधात आवाज उठवला जात आहे. अनेक ठिकाणी या विरोधामध्ये आंदोलने देखील झाली आहेत. कंत्राटी भरती पाठोपाठ आता सरकारी शाळांचे देखील खासगीकरण करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
राज्यातील सरकारी शाळांचा पायाभूत विकास व्हावा यासाठी या शाळा सुरुवातीला दहा वर्षांसाठी कार्पोरेट उद्योग समूह , स्वयंसेवी संस्था आदींना दत्तक दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यामध्ये सरकारी संस्थेंचे, कामांचे खाजगीकरण केले जात आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा वाढव्यात आणि सरकारी शाळांचा विकास व्हावा यासाठी शाळा आता खाजगी कंपनी , उद्योग समूह यांना चालवण्यासाठी दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी त्यांच्याकडील सीएसआर निधीचा वापर करता येईल, तसेच या समूहांना आपल्या आवडीच्या नावाप्रमाणे शाळांच्या नावापुढे आपले नावेही देता येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे देखील समोर आले आहे.
या आधी सरकारकडून विकासकामांना पुरेसा निधी मिळावा व प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त
जागांवर बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला. या कंत्राटी भरतीचा जीआर आल्यानंतर राज्यामध्ये वातावरण तापले. मराठा व धनगर आरक्षण यावर देखील राज्यामध्ये तीव्र उपोषणसुरु आहे. यामध्ये आता सरकारी शाळांचे देखील खाजगीकरण राज्य सरकार करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…