डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद, कोरोना काळात केली खरी देश सेवा – आमदार महेश लांडगे

महाराष्ट्र 14 न्यूज : भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने अध्यक्ष संकेत चोंधे व दिनेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भोसरी व परिसरातील ७० डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम इंद्रायणी नगर, भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता.

कोरोना सारख्या काळात समाजाच्या हितासाठी या सर्व डॉक्टरांनी अनमोल कार्य केले आहे. ही मोठी देशसेवा व कौतुकास्पद कामगिरी असल्याचे आमदार महेशदादा लांडगे ह्यांनी सांगितले. आमदार महेश लांडगे यांनी ह्या वर्षी वाढदिवस साजरा न करता आपला हा दिवस कोरोणा योध्याना समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

दादांच्या विचारांनी प्रेरित होऊन वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या या लढवय्यांचे योगदान समस्त देशासाठी प्रेरणादायी आहे, म्हणूनच त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी या काळात चांगले कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरवपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत असल्याचे मत आयोजक भाजपा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष शिवराज सुदामराव लांडगे यांनी व्यक्त केले.

युवा मोर्चा कोरोना च्या काळात लोकांपर्यंत पोहाचवण्यामधे नेहमी अग्रेसर राहिलेले आहे . लोकांना उपचार असतील बेड ची उपलब्धता मिळवून देण्यासाठी आम्हाला डॉक्टरांचे सहकार्य लाभले. अनेक रुग्ण सुखरूप आपल्या लोकांमधे आज आहेत ते डॉक्टरांनी केलेल्या सेवे मुळेच असे भोसरी च-होली मांडलचे अध्यक्ष उदय दत्तात्रय गायकवाड यांनी नमूद केले. चिटणीस प्रकाश यांनी डॉक्टरांनी केलेल्या सेवेसाठी त्यांचे आभार मानले.

यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून नगरसेवक राजेंद्र लांडगे, विलास मडीगेरी, महिला अध्यक्षा उज्वला गावडे, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, दत्ताभाऊ गव्हाणे तेच युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

7 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago