Categories: Editor Choice

अभिनेत्री स्वाती हनमघर ठरल्या ‘ विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021 ‘ च्या फस्ट रनरअप आणि मिसेस फोटोजेनीक!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ ऑक्टोबर) : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल स्वाती हनमघर यांनी नुकत्याच राजस्थान मधील जयपूर येथे संपन्न झालेल्या अग्रनामांकित अशा राष्ट्रीय पातळीवरील ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ या स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे. ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ स्पर्धेच्या त्या फस्ट रनरअप  ठरल्या आहेत. तसेच या स्पर्धेत त्यांना मिसेस फोटोजेनीक हा किताब सुद्धा मिळाला आहे.

‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ या  स्पर्धेचा यंदा 5 वा सीजन होता, यावर्षीची थीम ‘नारी तू नारायणी’ अशी होती. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी झाल्या होत्या.  या स्पर्धेत वेस्टर्न, ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न व स्पार्कल डिजाइनर आउटफिट्स थीम असे तीन राऊंड ठेवण्यात आले होते. या तीन राउंड्स मधून सिलेक्ट झालेल्या टॉप फाइनलिस्ट मॉडेल्स  या टाइटल क्राउन साठी पात्र ठरल्या होत्या असे अभिनेत्री स्वाती हनमघर यांनी सांगितले.

‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’स्पर्धेतील यशाबद्दल बोलताना अभिनेत्री स्वाती हनमघर म्हणाल्या की, हरिष सोनी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत मिस आणि मिसेस अशा दोन्ही गटात स्पर्धक सहभागी होत्या त्यात क्लासिक आणि गोल्ड अशा कॅटेगिरी होत्या, त्यातील क्लासिक मध्ये मी होते. यात मला ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ च्या फस्ट रनरअप आणि मिसेस फोटोजेनीक हे टायटल असे दोन क्राऊन मिळाले आहेत.  या पूर्वी मी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे, मात्र त्या पेक्षा वेगळा अनुभव या स्पर्धेतून मिळाला आहे. ग्रूमर, मेंटर यांच्याकडून शिकायला मिळाले, स्वतः ला सिद्ध करण्यासाठी हा मोठा प्लॅटफॉर्म होता, आमचा कॉन्फिडन्स दुप्पट वाढला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यानिमित्ताने मला सांगावे वाटते की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्यात असलेल्या गुणांचे कॉन्फिडन्सने सादरीकरण करा आणि आपण करत असलेल्या कामावर प्रेम करा मग तुम्ही वयाचा विचार न करता स्वतःला सिद्ध करू शकता,  आज माझ्या कुटुंब, मित्र परिवार आणि हितचिंतकांच्या प्रेरणेमुळे मी बालपणी बघितलेले स्वप्न पूर्ण झाले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago