Google Ad
Uncategorized

निलिमा चव्हाण च्या शोध तपासात टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू; पुणे नाभिक समाजाचा इशारा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ ऑगस्ट) : आपली बहीण निलिमा चव्हाण ही बेपत्ता असल्याची तक्रार चिपळूण पोलिस ठाण्यात देण्यासाठी आलेल्या तिच्या भावाला हद्दीच्या कारणावरून शोध तपासात टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करावी. नाभिक समाज कन्या निलिमाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा लवकरच छडा लावावा, अशी मागणी साठी पोलीस आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इथे पुणे नाभिक समजा च्या वतीने मुक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी दापोली येथून निघालेली निलिमा बेपत्ता झाली होती. मात्र, नंतर तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळून आला. नीलिमाच्या मृत्यू संशयास्पद असून या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान पुण्यातही पुणे नाभिक समजाच्या वतीने मुक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

Google Ad

यावेळी श्री चंद्रशेखर जगताप श्री गणेश वाळूजकर सौं बेबी ताई करेकरश्री भगवान शिंदेश्री समाधान गवळीश्री नितीन सुरवसेश्री दीपक कारागीरश्री दिगंबर शिरसाठ व समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित मध्ये मूक मोर्चा आणि जाहीर निषेध करून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!