Google Ad
Uncategorized

बच्चू कडू यांचा अपघात; पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जानेवारी) : अचलपूर – चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसत असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले

त्यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाल्याने त्यांना अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी ११ जानेवारीला सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.बच्चू कडू हे एका कार्यक्रमाला जाण्याकरिता अमरावतीत आले होते.

Google Ad

कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. दरम्यान भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले. Bachchu Kadu या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच पायाला दुखापत झाली. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आमदार कडू यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके लागले आहे. या अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!