महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० नोव्हेंबर) : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घटताना समोर येत आहे. आता बाणेर येथील महाबळेश्वर हॉटेल जवळ किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून तरुणावर बेछूट गोळीबार करण्यात आला.
ही घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी त्याच्या उजव्या मांडीत लागली आहे. जखमी झालेला तरुण स्वतःहून कासारसाई येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झाला.
आकाश पोपट बाणेकर असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य दीपक रणावरे, सागर लक्ष्मण बनसोडे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजराथ कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित ननावरे आणि आणि निलेश पिंपळेकर या दोघांमध्ये महाबळेश्वर हॉटेल जवळ वाद झाले होते. रोहितला निलेशमुळे कामावरून काढून टाकल्याचा गैरसमज झाला होता. त्यामुळे त्याने निलेशला महाबळेश्वर हॉटेलजवळ भेटायला बोलवले. त्यांच्यात यावेळी वाद झाले. त्यावेळी निलेश याने आकाशला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. त्यावेळी आकाशने रोहित ननवरे याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी देखील त्याने वाद घातला.
तिथून निघून गेलेल्या रोहितने मित्रांना गोळा केले आणि तो पुन्हा बाणेरमधील महाबळेश्वर हॉटेल जवळ आला. आदित्य, सागर यानी त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. आदित्यने बंदुकीमधून त्यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. यातील एक गोळी त्याच्या उजव्या मांडीत लागली. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पळालेला आकाश एकटाच लवळे येथील कासारसाईमध्ये असलेल्या एका रुग्णालयात स्वतःहून उपचारांसाठी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास चतुशृंगी पोलीस करीत आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…