Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड मनपाच्या सुरक्षारक्षकांनी भाजीविक्रेत्या महिला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागात कार्यरत असणाऱ्या दोन महिला सुरक्षारक्षकांनी भाजीविक्रेत्या महिला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक संबधित महिलेला मारहाण करत असल्याचं व्हिडीओ मध्ये दिसत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेनं एक पथक नेमल आहे. ज्या मध्ये MSF जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांची मदत घेऊन अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाते. मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही. तरीही असे प्रकार वारंवार घडत आहेत.

Google Ad

रस्त्याच्याकडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक संबधित महिलेला मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिला सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेचा हात पिरगाळत, पाठीत ठोसे मारत या भाजी विक्रेत्या महिलेला जमिनीवर ढकलून देत मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

शहरात वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने असे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेनं एक पथक नेमले आहे. या पथकाचे नेमके काम काय? काम नसताना हे सुरक्षा रक्षक मोबाईल वर खेळत असताना दिसतात, याकडे अधिकाऱ्याचे लक्ष नसते, यावर महानगरपालिका लाखो रुपयांचा खर्च करते यातून आजपर्यंत कय निष्पन्न झाले असा सवाल नागरिक करत आहेत.,  ज्यामध्ये MSF जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांमार्फत अतिक्रमण कारवाई केली जाते. मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही तरी देखील अशा प्रकारची मारहाण केल्या गेल्याने आता महापालिका प्रशासन काय कारवाई करत याकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!