महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जानेवारी २०२३) : आज दि.१२ जानेवारी रोजी दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचा दशक्रिया विधी पिंपळे गुरव येथे संपन्न झाला. यावेळी गहनीनाथ महाराज औसेकर यांची प्रवचन रुपी सेवा होती यात महाराजांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली, त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाजसेवेचे अविरत कार्य करीताना आपल्या धर्मासाठी खूप मोठी दानधर्माची सेवाही केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारा डोंगरावर होणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरास एक कोटी तीस लाख रुपयांच्या देणगीसह अनोखी श्रद्धांजली त्यांचे नातेवाईक व त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने वाहण्यात आली.
आज यावेळी उपस्थित असलेल्या जनसागरावरून त्यांच्यावर जनतेचे, गोरगरिबांविषयी असणारे प्रेम दिसून येत होते. यावेळी ह भ प औसेकर महाराज, नगरसेवक शशिकांत कदम, आमदार महेशदादा लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, सर संघ चालक विनोदजी बन्सल, दादा वेदक, सुनील टिंगरे, खासदार श्रीरंग बारणे, लहवितकर महाराज, पंकज महाराज गावडे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे यावेळी दिसत होते. त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
देश देव आणि धर्माशी एकनिष्ठ राहून वाटचाल करणारे लक्ष्मण भाऊ, आपल्यातुन गेले. भाऊंनी केलेले कार्य आणि त्यांचा सारखा प्रभावी लोकनेता या परिसरात निर्माण होणे कठीण आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ ऑगस्ट २०२५ :* हातामध्ये तिरंगा घेऊन चालणारे विद्यार्थी, देशभक्तीच्या घोषणांनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…
यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…
आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…