आज दि.१२ जानेवारी रोजी दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचा दशक्रिया विधी पिंपळे गुरव येथे संपन्न झाला. यावेळी गहनीनाथ महाराज औसेकर यांची प्रवचन रुपी सेवा होती यात महाराजांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली, त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाजसेवेचे अविरत कार्य करीताना आपल्या धर्मासाठी खूप मोठी दानधर्माची सेवाही केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारा डोंगरावर होणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरास एक कोटी तीस लाख रुपयांच्या देणगीसह अनोखी श्रद्धांजली त्यांचे नातेवाईक व त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने वाहण्यात आली.
आज यावेळी उपस्थित असलेल्या जनसागरावरून त्यांच्यावर जनतेचे, गोरगरिबांविषयी असणारे प्रेम दिसून येत होते. यावेळी ह भ प औसेकर महाराज, नगरसेवक शशिकांत कदम, आमदार महेशदादा लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, सर संघ चालक विनोदजी बन्सल, दादा वेदक, सुनील टिंगरे, खासदार श्रीरंग बारणे, लहवितकर महाराज यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे यावेळी दिसत होते. त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…