Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड मध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नवीन समीकरण …?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सर्वात स्मार्ट महापालिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

तसेच निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आमने सामने लढतील असे जाहीर केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेवर मागील काही वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता पुन्हा कायम राखण्यासाठी भाजपने आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांच्या हालचालींना गती मिळाली. तर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आता जवळपास निश्चित मानली जात असून, यामुळे शहराच्या राजकारणात नवं समीकरण तयार झालं आहे.

सुरुवातीला अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता धूसर झाल्यानंतर पर्यायी राजकीय आघाडीचा विचार सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी चिंचवडमध्ये बलाढ्य भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. जरी ही युती सत्तेसाठीची तडजोड वाटत असली, तरी या नव्या समीकरणामुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा विश्वास दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

तर पुणे महानगरपालिका निवडणूकित पुणे शहरात महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर आमच्या एकत्र लढण्याने विरोधकांना फायदा होणार असल्याने आम्ही वेगवेगळे निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

4 days ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

1 week ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

1 week ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

1 month ago