A. Nagar : राज्यातल्या या जिल्ह्यात मे महिन्यात जवळपास ८ हजारहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण …

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून विविध पातळीवर उपाययोजना केली जात आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा लहान मुलांना बसणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवरही प्रशासनानं उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राज्यातल्या अहमदनगर मध्ये मे महिन्यात जवळपास 8 हजारहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली.

कोविड- 19 (COVID-19 ) च्या तिसऱ्या लाटेत संसर्ग कमी करण्यासाठी राज्यानं अतिरिक्त पावलं उचलली आहेत. ज्यात मुलांवर कमी परिणाम होईल. अहमदनगरमध्ये मे महिन्यात जवळपास 8 हजारहून अधिक लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली. जिल्ह्यातील जवळपास 10 टक्के प्रकरणे नोंदली गेली. यानंतर प्रशासनानं आपली पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनानं आता तिसरी लाटेची (third wave) तयारी सुरु केली असून सध्या बालरोग तज्ज्ञांशी बातचित सुरु आहे.

फक्त मे महिन्यातच 8 हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. हे चिंताजनक असल्याचं अहमदनगरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार असणं आवश्यक असल्याचं आमदार संग्राम जगताप म्हणालेत. जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली. सध्या राज्य सरकारकडून जिल्हा पातळीवर चर्चा सुरु असल्याचंही बोललं जात आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

10 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

10 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago