Categories: Uncategorized

पुण्यातील ऐश्वर्य कट्ट्यावर बँकिंगच्या विविध अनुभवांनी रंगली गप्पांची मैफिल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ जानेवारी) : पुण्यातील ऐश्वर्य कट्ट्यावर बँकिंगच्या विविध अनुभवांनी रंगली गप्पांची मैफिल! आपल्या कर्तुत्वाने ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला व आपल्या व्यवसायाबरोबरच संस्थेला सुद्धा स्थैर्य प्राप्त करून दिले सर्वसामान्य माणसाची पत वाढवली व त्यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी मदत केली अशा सहकारी बँकांच्या अध्यक्ष व संचालकांनी आर्थिक क्षेत्रातील घडामोडी व सहकारातील किस्से व माहिती सांगून रंगत आणली आजच्या कथेचे मानकरी होते पुणे अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष निलेश अण्णा ढमढेरे पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विजयराव ढेरे, विश्वेश्वर बँकेचे राजुशेठ मिरजे व शाहू सहकारी बँकेचे संजय शेठ धनकवडे

यावेळी या सर्वांनी मनमोकळेपणाने सर्वांशी अनुभव कथन केले बँकिक क्षेत्राच्या व्यतिरिक्त त्यांनी उद्योग व्यवसाय सुद्धा मोठ्या नावलौकिक कमावलेला आहे त्याबाबतची त्यांनी माहिती दिली सर्व मान्यवरांचे औक्षण करून शंखनादाने स्वागत करण्यात आले मोत्याची माळ शिंदेशाही पगडी व सन्मानपत्र देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले निलेश अण्णा ढमढेरे यांनी सहकारी बँकांना सध्याच्या परिस्थिती मधील असणारी आव्हाने व स्पर्धा व बदलती आर्थिक परिस्थिती याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. विजयराव ढेरे यांनी माणूस जगला तरच आर्थिक संस्था जगतील असे सांगून कायदा व माणुसकीची सांगड घालून संस्था चालवणे आवश्यक आहे असे सांगितले,

त्यांच्या दुग्ध व्यवसायातील सुद्धा अतिशय उपयुक्त माहिती त्यांनी दिली राजुशेठ मिरजे यांनी प्लास्टिक व्यवसाय व असोशियन यांच्या बद्दल अतिशय सुंदर माहिती सांगितली व प्लास्टिक विषयी आपले असणारे गैरसमज दूर केले विश्वेश्वर बँकेच्या माध्यमाने एका तऱ्हेने सामाजिक कार्य करत असल्याचे त्यांनी नम्रपणाने नमूद केले संजय धनकवडे यांनी शाहू सहकारी बँकेच्या असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली कॉलेज जीवनात पाहिलेले साखर कारखाना उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आल्यानंतर मिळणाऱ्या आनंदाचे कथन केले.

तसेच सुंदर गाणे गाऊन आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व दाखवून दिले सर्व मान्यवरांनी मनमोकळेपणाने सुसंवाद साधल्याने वैचारिक देवाण-घेवाणीची ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली यावेळी माझ्यासह विद्युत येनपुरे, सोमनाथ सोमानी, अशोकराव काळे ,सर्जेराव शिळीमकर ,युवराज रेणुसे , शंकरराव कडू, दिलीप जगताप, रवींद्र संचेती ,नेमीचंद सोळंकी ,संदीप फडके ,मंगेश साळुंखे, सुनील सोनवणे, संदीप भोसले ,अक्षय लिमन ,मनोज तोडकर, शिरीष चव्हाण व आप्पा रेणुसे मित्र परिवार उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago