नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांच्या नेतृत्वाखालील ५ सदस्यीय शिष्टमंडळाची आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ६ जुलै २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महिलांसाठी राबविलेल्या योजना चांगल्या असून त्या अनुकरणीय असल्याचे मत नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांनी व्यक्त केल्या.  महिला बालकांच्या उत्थानासाठी आखलेल्या योजना प्रशंसनीय असून पिंपरी चिंचवड महापालिकेने यासाठी दूरदृष्टीकोन सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे असेही त्या म्हणाल्या.

सभापती स्वाती भामरे यांच्या नेतृत्वाखालील ५ सदस्यीय शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट देऊन नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांची माहिती घेतली.  त्यावेळी प्रतिक्रीया देताना  सभापती  भामरे बोलत होत्या.  शिष्टमंडळामध्ये महिला व बाल कल्याण समिती सदस्या पुनम मोगरे, नयना गांगुर्डे, रंजना बोराडे, समिना मेनन, माधुरी बोलकर यांचा सहभाग होता.

प्रारंभी, महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सभापती भामरे यांच्यासह शिष्टमंडळाचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.  यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, योगिता नागरगोजे, माधवी राजापुरे, सुनिता तापकीर आदी उपस्थित होत्या.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या कामाची चित्रफीत शिष्टमंडळाला दाखविण्यात आली.  महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये  शिष्टमंडळासमवेत या योजनांबद्दल चर्चा झाली.  नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपआयुक्त अजय चारठणकर आणि समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी नागरवस्ती विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध विभागांची माहिती दिली.  यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

8 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

16 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago