Google Ad
Uncategorized

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी संपूर्ण रुग्णालयाचा सविस्तर आढावा उपमहापौर यांना दिला.

यावेळी उपमहापौर बाबर यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची प्रकृती, सुरू असलेले उपचार तसेच रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, उपचारांची गुणवत्ता आणि विविध विभागांतील कामकाजाची पद्धत याचीही त्यांनी पाहणी केली.

Google Ad

रुग्णालयातील ओपीडी, आपत्कालीन सेवा, तसेच इतर महत्त्वाच्या विभागांतील उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

तसेच रुग्णालयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुधारणा, उपलब्ध सुविधांचा विस्तार तसेच रुग्णालयासमोरील अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र वाबळे तसेच वायसीएम रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
…..

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार, जलद आणि परिणामकारक आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

– शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!