Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवडमध्ये पवनेच्या तिरावरील श्रीसाई सेवा कुंज आश्रमात ‘अक्रुर महाराज साखरे’ यांच्या भक्तिमय स्वराने किर्तन महोत्सवाची सांगता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ डिसेंबर) : कासारवाडी येथील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रमामध्ये दिनांक २१ डिसेंबर ते दिनांक २७ डिसेंबर या कालावधीमध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज (दि.२७ डिसेंबर) समारोपाच्या दिवशी दत्तप्रभूंच्या पालखीची कासारवाडी गावात मिरवणूक काढण्यात आली, यामध्ये भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

या साप्तहात विविध नामांकित कीर्तनकारांनी आपली किर्तनसेवा केली. हे श्रीविठ्ठला! तुझ्या दिव्य चरणकमलांची सेवा अखंडित, नित्य मला घडावी. हीच माझी मागणी! मला भू-वैकुंठ असणाऱ्या पंढरीत राहता यावे. माझा वास पंढरीत असावा. इथे राहिल्याने मला नित्य, सदासर्वदा हरिदासांचा संग घडेल, सत्संग घडेल. असे प्रतिपादन आपल्या हरिकिर्तनातून ‘अक्रुर महाराज साखरे’ यांनी केले. आज ( दि.२७ डिसेंबर) बुधवार सकाळी १० वाजता ह. भ. प. अक्रूर महाराज साखरे यांनी काल्याचे किर्तन केले. आपल्या कीर्तनातून त्यांनी काल्याच्या कीर्तनाचे महत्त्व सांगितले.

Google Ad

कासारवाडी व पिंपळे गुरव परिसरातील भाविक या कीर्तन सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवार व श्रीसाई सेवा कुंज आश्रम यांच्यावतीने करण्यात आले होते. दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता दत्त भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला.

या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचा श्रीसाई सेवा कुंज आश्रम व लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्याच्या वतीने सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दत्त आश्रमाचे प्रमुख शिवानंद स्वामी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार मानले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!