Google Ad
Uncategorized

तानाजी जवळकर यांचे पिंपळे गुरव परिसरातील काही समस्या सोडवण्यासाठीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑगस्ट) : राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पावणेदोन महिन्यांनी अजित पवार हे शुक्रवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले. यावेळी फुलांची मुक्त उधळण करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपळे गुरव भागातील युवा कार्यकर्ते तानाजी जवळकर यांनी आपल्या पिंपळे गुरव परिसरातील काही समस्या सोडवण्यासाठीचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंहगड काॅलनी, ऋतुराज काॅलनी, श्रीकृष्ण मंदिर रोड, जवळकर नगर ते कल्पतरु फेज 1 येथील रस्ता सिमेंट काँक्रीट चा बनवण्यात यावा, ड्रेनेज संदर्भातील, चिल्ड्रन प्ले पार्क बनवण्याबाबत, कै.बट्टुराव जगताप उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

Google Ad

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राजेंद्र जगताप, शाम जगताप, अरुण पवार शिवाजी पाडुळे, विष्णू शेळके, सुरेश देवराज व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!