Google Ad
Uncategorized

स्वप्नांना सत्यात उतरवण्याआधी त्यांना व्यवस्थित पहावे लागते … नाईक आण्णासाहेब धुंडगे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जुलै) :- विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचे की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे स्वतःला यशस्वी होण्यासाठी नेहमीच प्रयत्नवादी असणे गरजेचे असते. आम्ही ज्यावेळी युद्धभूमीवर असतो त्यावेळी यश मिळते की नाही हे माहीत नसते, पण जिंकणार आम्हीच हीच भावना घेऊन आम्ही युद्ध करतो. म्हणुनच आपण कारगिल मध्ये विजय मिळवू शकलो. आपण स्वप्नांना सत्यात उतरवण्याआधी त्यांना व्यवस्थित पहावे लागते, तरच ती पूर्ण होतात असे मत 24.मराठा लाईफ इन्फंट्री औंध कॅम्प चे सेना मेडल विजेते नाईक आण्णासाहेब धूंडगे यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशुविहर सांगवी आयोजित ‘कारगिल विजय दिन’ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

मी ही एका सामान्य कुटुंबातला असून लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं, फौज मध्ये भरती व्हायचं आणि देश सेवा करायची, ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. घाबरू नका, सत्याला सामोरे जा आणि प्रयत्न करा! यश नक्कीच मिळेल .तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने एक प्रतिभावंत व्यक्ती आहे आणि शिक्षक आदर्श गुरुजन वर्ग आहे, त्यामुळे तुमचे भविष्य हे उज्वल असणार आहे यात शंका नाही असे ते म्हणाले. यावेळी 24 मराठा लाईफ इन्फंट्री औंध कॅम्प चे हवालदार राजेंद्र काळे, विनायक यादव, पवन ठाकूर यांनी कारगिल युद्धाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

Google Ad

याप्रसंगी बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ज्या दोन हजार राख्या बनवल्या होत्या त्या राख्या सीमेवरील जवानांसाठी या 24 मराठा लाईन इन्फंट्री च्या अधिकाऱ्यांच्या हस्ते पाठवण्यात आल्या. अतिशय देशभक्तीपर वातावरण शाळेमध्ये होते सर्वांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली, या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले, खजिनदार रामभाऊ खोडदे,सचिव तुळशीराम नवले , सदस्य प्रकाश ढोरे, राजश्री पोटे व जयहिंद फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सीमा पाटील ,हेमलता नवले ,मनीषा लाड, स्वप्नील कदम, पंचशीला वाघमारे,शितल शितोळे, दिपाली झणझणे, श्रद्धा जाधव, संध्या पुरोहित ,गायत्री कोकाटे , भारती घोरपडे,नीता ढमाले, निर्मला भोईटे, अश्विनी करे,कुसुम ढमाले, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक, शिवाजीराव माने यांनी केले व निवेदन आभार शिक्षक दत्तात्रय जगताप यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!