Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून मार्च २०२३ अखेर ३४ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त … सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३१ मार्च २०२३) :- सेवानिवृत्ती म्हणजे जगण्याची दुसरी नवीन आवृत्ती असून सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांच्या इच्छेनुसार समाजसेवेसारख्या उपक्रमास वेळ देऊन सतत कार्यरत राहावे आणि आपले पुढील आयुष्य आरोग्य सांभाळून आनंदाने जगावे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले तसेच सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते माहे मार्च २०२३ अखेर सेवानिवृत्त होणा-या २३ तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या ११ अशा एकूण ३४ कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Google Ad

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले, उमेश बांदल, शेखर गावडे, नंदुकुमार इंदलकर, नितीन समगीर, चारुशीला जोशी, माजी प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे मार्च २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, मुख्याध्यापक मधुमती गुंजेगावकर, मुख्याध्यापिका कमरुन्निसा सय्यद, लघुलेखक राजू ठाकरे, उपलेखापाल अनिरुद्ध अदाबे, सिस्टर इनचार्ज हेंड्रीना जॉन, मुख्य लिपिक रविंद्र बाराथे, प्रकाश मांडवकर, पदवीधर शिक्षिका अलका पाटील, सुरेखा साळुंके, सुरैय्या आत्तार, चारुशीला ननावरे, उपशिक्षिका सुनिता दिवेकर, लिपिक राजन शुक्ला, प्रयोगशाळा सहाय्यक मिलिंद भोसले, मिटर निरिक्षक मच्छिन्द्र कोल्हे, लिफ्टमन भगवान लोंढे, रखवालदार अरुण कदम, चंद्रकांत साठे, शिपाई चंद्रकांत ढोरे, आशा तेलकर, सफाई सेवक ओमी सुनसुना, गटरकुली दत्तु कांबळे यांचा समावेश आहे.

तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये उपअभियंता स्थापत्य अनिल मेंगशेट्टी, कनिष्ठ अभियंता नवनाथ शेळके, मुख्य लिपिक हनमंता निली, फार्मासीस्ट आशुतोष मरळे, उपशिक्षिका उज्वला ढमढेरे, सफाई कामगार संपतकुमारी लख्खन, सुनिता जाधव, दिलीप पंडागळे, गटरकुली अनिल गायकवाड, सुनिल कांबळे, संतोष गाडेकर यांचा समावेश आहे.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी त्यांच्या मनोगतात बोलतांना आशादेवी दुरगुडे यांनी १९८३ साली लिपिक पदावर रुजू होऊन मुख्य लिपिक, कार्यालय अधिक्षक, प्रशासन अधिकारी, सहायक आयुक्त, उप आयुक्त अशी पदोन्नत्ती घेत घेत पहिल्या महिला सह आयुक्त होण्याचा मान मिळविला आणि महानगरपालिकेचे ३९ वर्ष ८ महिने इतकी प्रदिर्घ सेवा केली, त्याच प्रमाणे आज सेवानिवृत्त होत असलेल्या इतर अनुभवी, उत्साही कर्मचा-यांमुळे महानगरपालिकेचा नावलौकिक वाढून वेगळा आदर्श निर्माण झाला असे सांगून त्यांनी सेवानिवृत्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी आपला परिचय देताना महानगरपालिकेत झालेली त्यांची सेवा, विविध विभागात काम करीत असतांना त्यांना आलेले अनुभव सर्वाना सांगितले तसेचसेवेत असतांना वरिष्ठ अधिकारी, सहकारी, कर्मचा-यांनी त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. महासंघाचे पदअधिकारी अभिमान भोसले, चारुशीला जोशी यांनी सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!