महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ फेब्रुवारी) : नवी सांगवी येथील
प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यामध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.” खेळ” म्हटला की विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा आवडीचा विषय असतो. संस्था सदस्य सौ. स्वाती पवार,पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.जयश्री माळी, माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर, श्री देवराम पिंजन यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.
शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडाचे महत्व जाणून देणारे नृत्य सादर केले. इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी (कुमारी- हेतल जावळे) हिने खेळाचे महत्व आपल्या मनोगतातून सांगितले .
खेळामुळे शरीर निरोगी राहते त्यासोबत मनाला देखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका आहे. शाळकरी मुले मनसोक्त खेळतात, त्यामुळे शारीरिक विकासाबरोबर मनाचाही विकास होतो. यावेळी श्रीमती मेघा भोकरे यांनी क्रीडा स्पर्धेची (शपथ ) विद्यार्थ्यांना दिली. या क्रीडा स्पर्धेत (30 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, बुक बॅलन्सिंग, बास्केटबॉल डिबेलिंग, लंगडी, सॅक रेस, अडथळा शर्यत) अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सचिव श्री. शंकर शेठ जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. या वार्षिक क्रीडा संमेलनात सर्व शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला व शिक्षकेतर कर्मचारी ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री संजय पार्टे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ.सुवर्णा गडपोल यांनी केले व आभार सौ.शितल पवार यांनी आभार मानले .