Google Ad
Editor Choice

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात यावी याकरिता भाजपला चिंचवड मध्ये या पक्षाची होणार मोठी मदत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जानेवारी) : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुण्यात दोन महत्वाच्या पोट निवडणूका होणार असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्यावर्षी 22 डिसेंबरला निधन झाले होते. तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी 3 जानेवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झाले . विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील त्यांच्या त्या विधानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीतून पुण्यात आले. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी देवेंद्र फडवीस पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी जगताप याच्या घरी जाऊन कुटूंबियांची भेट घेतली. त्यावेळी ते पुण्यात भाजपच्या नेत्यांनादेखील भेटले. त्यामुळे नेमका उमेदवार निश्चित होणार का, निवडणूक बिनविरोध होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

अशातच सध्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जगताप कुटुंबातील सदस्य उमेदवार कोण? म्हणून सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. असे असताना लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप घरंण्याबाबत आदरभाव व्यक्त करीत चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात यावी याकरिता पिंपरी चिंचवड मनसेच्या वतीने आज (दि. २८जानेवारी) भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, व RPI- [ A ] – अध्यक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्ट मंडळ यांनी मध्यवर्ती मनसे शहर कार्यालय पिंपरी येथे भेट दिली व मनसे कार्यकारणी यांच्याशी संवाद साधला, भारतीय जनता पक्षाने तसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लेखी पत्र दिले.

आपली पुढील भूमिका आदरणीय राजसाहेब व आपले पिंपरी चिंचवडचे प्रभारी आपल्याला आदेश देतील…..

शहरअध्यक्ष —सचिन चिखले..

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!