Google Ad
Editor Choice

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी २९ जानेवारी ला भंडारा डोंगराला भेट देणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जानेवारी) : जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त (वसंत पंचमी) श्रीराम कथा वाचक मुरारी बापू यांचे 21 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 दरम्यान संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरामध्ये श्रीराम कथा वाचन सुरू आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संस्थानच्या वतीने निमंत्रित करण्यात आले होते, खासदार श्रीरंग बारणे, देहू संस्थानचे अध्यक्ष हभप नितिन महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख हभप संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विश्‍वस्त संतोष महाराज मोरे, शिवसेना देहू शहरप्रमुख सुनील हगवणे आदींनी त्यांना येण्याचे निमंत्रण दिले होते.

भंडारा डोंगराला भेदून जाणाऱ्या रिंगरोडमध्ये बदल केल्याबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार मानले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना भंडारा डोंगराला भेट देण्याची विनंती केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भेट देण्याची ग्वाही दिली, त्यामुळे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा डोंगराला भेट देण्यासाठी येत आहेत.

Google Ad

श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे जागतिक कीर्तीचे भव्य मंदिर साकारले जात आहे. तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे शिल्प उभारले जाणार असून मंदिराचे काम वेगात सुरू आहे. मंदिराच्या कामाची माहिती घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रविवारी २९ जाने. रोजी येत असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement