Google Ad
Editor Choice

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जानेवारी) : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे २५ ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले असून. प्रदर्शनाचे उद्‍घाटन आज खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे आणि विश्वस्त अनुपमा बर्वे ,श्रीनाथ कवडे ,सुमन किलोस्कर , प्रशांत काळे , प्रशांत चव्हाण ,आदी मान्यवर उपस्थित होते . ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.. या वर्षीचे प्रदर्शन संस्थेचे मा. अध्यक्ष स्व. श्री. राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित करीत आहोत.

पुष्पप्रदर्शन २६ ते २९ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत.

Google Ad

यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून लवकरच पुणेकरांना यांचा आनंद घेता येणार आहे. संस्थेमार्फत अगदी १०० वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम ठेवलेली आहे.

बागेमध्ये पुन्हा नव्याने पुष्पप्रदर्शन भरविण्यास जानेवारी, १९९८ सालापासून सुरूवात झाली. अगदी पहिल्या प्रदर्शनापासून पुणेकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती इ. गोष्टींचा समावेश असतो. पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे १००० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार दि. २२ जाने. २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षीदेखील) जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील, एरवी केवळ पानांनी, वेलींनी व हिरवाईने नटलेली एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!