महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑगस्ट) : रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक मा.रुपाली बोबडे तसेच पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.लक्ष्मण गोफने सर सहाय्यक आरोग्य अधिकारी मा. अभयचंद्र दादेराव व संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताद्वारे मानवंदना देण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवर मा.रुपाली बोबडे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त असे मत व्यक्त केले की आपण सर्वांनी या राष्ट्राचा व राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे व राष्ट्राच्या प्रगतीसाठी आजच्या तरुणांनी पुढे आले पाहिजे. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी असे मत व्यक्त केले की आपल्या पूर्वजांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळवलेले आहे व ते अबाधित राखून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे व त्यासाठी आपण झटले पाहिजे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर यांनी असे मत व्यक्त केले की आपण जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आपण प्रथम भारतीय आहोत ही भावना जोपासली पाहिजे तरच हा भारत अधिक बलशाली होणार आहे.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच राज्य कार्यकारणीचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे,सचिव नीरज भालेराव,सहसचिव प्रगती कोपरे,संघटक रोहित कांबळे,संपर्कप्रमुख अतुल वाघमारे,प्रवक्ते प्रा.विक्रांत शेळके पश्चिम महाराष्ट्र सचिव समाधान गायकवाड तसेच पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणीचे शहर अध्यक्ष अभिषेक चक्रनारायण,प्रभारी अध्यक्ष योगेश कांबळे,उपाध्यक्ष भाग्यश्री आखाडे,सचिव अजय चक्रनारायण,सहसचिव सचिन सूर्यवंशी,समन्वयक प्रतिभा बनसोडे,सोशल मीडिया इन्चार्ज शमशोद्दिनगाजी शेख,करण कांबळे,सदस्य अमित बोदडे,सिद्धार्थ सूर्यवंशी,निलेश आठवले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री आखाडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शिंदे,आभार अभिषेक चक्रनारायण यांनी केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…