Google Ad
Uncategorized

कोकण खेड युवाशक्तीचा ५ वा वर्धापनदिन मोठया उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५एप्रिल) : ४ एप्रिल रोजी कोकण खेड युवाशक्तीचा ५ वा वर्धापनदिन इंदू लॉन्स काळेवाडी येथे साजरा करण्यात आला. कोकण खेड युवाशक्तीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे सामाजिक हिताचे, सामाजिक बांधिलकी* म्हणून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. युवाशक्तीच्या या यशस्वी वाटचालीसाठी सर्व कोकणवासीय समाजबांधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

४ एप्रिल युवाशक्तीच्या ५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून *रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये ५५ लोकांनी यात सहभाग घेतला, त्यानंतर स्नेहमेळावा, महिलांसाठी खेळ पैठणीचा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Google Ad

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. तसेच *कोकण सुपुत्र, हास्यविनोद, कलाकार, अभिनेते अंशुमनदादा विचारे* हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, पिंपरी चिंचवड मधील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.

कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष श्री. सुरज उत्तेकर* यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवाशक्तीचे सर्व कार्यकारणी, सभासद, मार्गदर्शक, सल्लागार उपस्थित होते, आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक मा. श्री.अक्षय भाऊ मोरे व प्रा. संदिप कदम सर यांनी केले,आणि प्रा.संदीप कदम सर यांनी उपस्थित लोकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!