Google Ad
Uncategorized

५ सहस्र किलो भेसळयुक्‍त पनीरचा साठा पुणे येथे जप्‍त !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० ऑगस्ट) : कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला ५ सहस्र किलो भेसळयुक्‍त पनीरचा साठा जप्‍त करण्‍यात आला आहे. अन्‍न आणि औषध प्रशासन अन् पोलीस यांनी कात्रज परिसरात ही कारवाई केली.

भेसळयुक्‍त पनीरचे नमुने ‘बाणेर नॅशनल अ‍ॅग्रिकल्‍चरल अँड फूड अ‍ॅनालिसिस अँड रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’ येथील प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्‍यात आले. त्‍यापैकी काही पिशव्‍यांमधील पनीर हे भेसळयुक्‍त असल्‍याचा अहवाल नुकताच प्राप्‍त झाला. मानवी शरिरास घातक असलेला १० लाख रुपये किमतीचा हा भेसळयुक्‍त पनीरचा साठा नष्‍ट करण्‍यात येणार आहे, तसेच संबंधितांवर न्‍यायालयीन कारवाई करण्‍यात येत असल्‍याची माहिती देण्‍यात आली.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!