महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजातील समस्त घटकांना संघटित करण्याचे पवित्र कार्य गेली ९८ वर्षे करीत आहे. स्वयंसेवकांचे निष्कलंक चारित्र्य, जाज्वल्य देशभक्ती, प्रामाणिकपणा व प्रचंड कष्ट घेऊन केलेल्या समाजाभिमुख कार्यामुळे समाजातील सर्व वयोगटातील व्यक्तींना संघकार्यात जोडून घेण्याची इच्छा होत आहे. समाजाकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे संघाचे कार्यकर्तेही अधिक जोमाने कार्य करीत आहेत. देशव्यापी विशाल संघटनेचे पिंपरी चिंचवडमधील संघटनात्मक कार्याचे स्वरूप दाखविण्यासाठी आज (दि. १५ जानेवारी) नवी सांगवी पी डब्लू डी मैदानावर मकरसंक्रांत उत्सव यावर्षी मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून व्यक्ती निर्माणाचे पवित्र कार्य गेल्या ९८ वर्षांपासून सुरू आहे. जाती विरहित संपूर्ण हिंदू समाज एकत्रित होऊन राष्ट्र सर्वप्रथम हा भाव जागृत व्हावा. हा दृष्टीकोन संघ शाखाद्वारे विकसित होतो, असे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुनील कुलकर्णी यांनी केले.

नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर रविवारी सायंकाळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘मकर उत्सव’ सांगवीत उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी आत्म केंद्री मनुष्य राष्ट्र हिताचा मोठा विचार करू शकत नाही. त्यामुळे व्यक्ती समाजाभिमुख होण्याकरिता संघ भाव जागरण करतो. संघ स्वयंसेवक मोठ्या सेवाकार्य, राष्ट्र कार्याच्या पवित्र कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत असे सुनील कुलकर्णी याप्रसंगी आपल्या मनोगतात म्हणाले.
यावेळी प्रमुख वक्ते अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुनील कुलकर्णी, प्रमुख अतिथी भारतीय नौसेना लेफ्टनंट कमांडर निवृत्त भानुदास जाधव, पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बंसल उत्सव प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहारातू हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक येथील मैदानावर उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांनी आपले कला कौशल्य सादर केले.कार्यक्रम प्रसंगी आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, माजी महापौर माई ढोरे, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील तांबे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, अजय दूधभाते आदी मान्यवर उपस्थित होते.