महानगरपालिकेच्या वैद्यकीय संचालक तथा आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी, डॉ. वर्षा डांगे, सी.एस.आर प्रमुख विजय वावरे यांनी बेबी वॉर्मरचा स्वीकार केला. महानगरपालिका हद्दीतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी अत्यावश्यक असलेल्या बेबी वॉर्मर मुळे अतिदक्षता विभाग आणि नवजात शिशु कक्ष अधिक सुसज्ज होऊन नवजात बालकांना याचा रोज फायदा होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराबरोबरच पुणे व रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णालयांना देखील ७९ म्हणजे एकूण ११० बेबी वॉर्मर देण्याचा उपक्रम यावर्षी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या कौटुंबिय चंपाबाई परमार एज्युकेशनल फाऊंडेशन या ट्रस्टच्या वतीने हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन समाजात एक मानवतेचा संदेश पोहचविण्याचा हा उत्तम प्रयत्न असल्याची माहिती रोटेरीयन आदिती जोशी यांनी दिली. सदर कार्यक्रमात मनोगतात बोलताना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांनी अशा उपक्रमांसाठी रोटरी क्लब नेहमीच अग्रेसर असतात व समाजातील तळागाळातील गरीब गरजू उपेक्षितांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य रोटरी क्लब सतत करत आले आहेत असा आवर्जून उल्लेख केला. तसेच वर्षाच्या सुरुवातीलाच प्रोजेक्ट ममता आमचे स्वप्न होते व ते आज पूर्ण करण्यासाठी आमचे कुटुंबीय तसेच विश्वस्त मंडळाकडून फार मोलाची मदत झाली असल्याचे मनोगत व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकिय संचालक तथा आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक करत रोटरी इंटरनॅशनल ही संस्था नेहमी समाजातील गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना योग्य ती मदत करण्याचे समाज उपयोगी कार्य करत आहे. रोटरीच्या जागतिक पोलिओ निर्मूलन या अगदी जुन्या उपक्रमापासून ते आत्ताच्या कोविडमध्ये केलेल्या समाज कार्याला उजाळा दिला व आजच्या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. त्यांनी दिलेल्या सर्व उपकरणांची योग्य काळजी व वापर करण्यात येईल असे अश्वासन दिले. तसेच रोटरी क्लबच्या वतीने भविष्यातही असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे पदाधिकारी सी.एस.आर. प्रमुख डॉ. विजय वावरे, सिनर्जी प्रमुख चारू श्रोत्री, ग्लोबल ग्रँड प्रमुख संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पूना वेस्टच्या अध्यक्षा भाग्यश्री भिडे, रोटरी निगडी क्लबच्या अध्यक्षा प्रणिता अलुरकर, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर नितीन धमाले, अनिल नेवाळे, आदिती जोशी, राम भोसले, रविंद्र भावे, दीपक सोनावणे व इतर अनेक रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर वर्षा डांगे यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…