Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगीत अकादमीचा २१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात  साजरा

 महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ९ जून  २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगीत अकादमीचा २१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात येत असून यामध्ये  शास्त्रीय गायन, सुगम संगीत, हार्मोनियम वादन तसेच तबला वादनाचे सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत.  सुप्रसिद्ध गायक विराज जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचा उपस्थितांनी निखळ आणि सात्विक आनंद घेतला.

          महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत संगीत अकादमीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त निगडी येथील संत तुकाराम महाराज व्यापार संकुल येथे महापालिकेच्या संगीत अकादमीमध्ये तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. पहिल्या दिवशीच्या  कार्यक्रमात भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे नातू गायक विराज जोशी यांच्या  शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांना तबला साथ संतोष साळवे, हार्मोनियम साथ उमेश पुरोहित तर तानपुरा साथ नीलिमा बोरकर यांनी दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सूर्यवंशी यांनी केले.

या कार्यक्रमास क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडाधिकारी अनिता केदारी, माजी क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर यांच्यासह संगीत विषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये दोन  दिवस संगीत सेमिनारचे  आयोजन करण्यात आले आहे.   यामध्ये तबलावादन, सुगम संगीताचे सेमिनारचा समावेश आहे.

           शहरात संगीत क्षेत्रात दर्जेदार कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने महापालिकेने संगीत अकादमीची स्थापना केली.  या ठिकाणी शास्त्रीय गायन, सुगम संगीत, हार्मोनियम वादन तसेच तबला वादनाचे नाममात्र शुल्कामध्ये प्रशिक्षण दिले जाते.  येथे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आता नामवंत ठिकाणी कार्यरत आहेत. संगीत क्षेत्रातील अनेक बारकावे विद्यार्थ्यांना कळावेत यासाठी संगीत अकादमीच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात.

शुक्रवार दि. सकाळी १० ते साडे अकरा  या वेळेत हार्मोनियम तर सकाळी साडे अकरा  ते दुपारी १ वाजेपर्यंत शास्त्रीय गायनाचे सेमिनार संपन्न होणार आहे.  जास्तीत जास्त नागरिकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

21 mins ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago