Google Ad
Uncategorized

पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे अंतिम वर्षातील १,७१८ विध्यार्थ्यांसाठी २,१७० नोकऱ्या

महाराष्ट्र 14 न्यूज, पुणे (दि. २४ जुलै २०२३) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व तळेगाव येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय (एनएमआयईटी, एनसीईआर) मधील अंतिम वर्षातील १,७१८ विध्यार्थ्यांसाठी आतापर्यंत २,१७० नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे घेण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यात विविध कंपन्यांनी मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना ३.५ लाख रुपये ते ६१ लाख रूपयांपेक्षा अधिक वार्षिक पगाराच्या नोक-या मिळाल्या आहेत. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व सर्व विश्वस्तांनी सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या सर्व प्राध्यापकांचे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, अशी माहिती पीसीईटी, नूतन व पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पीसीसीओई, पीसीसीओईआर व तळेगाव येथील एनएमआयईटी आणि एनसीईआर महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकिचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याठिकाणी घेण्यात येणा-या रोजगार मेळाव्यात चालू वर्षी नामांकित कॅपजेमिनी (५४७), कॉग्निझंट (२२९), ॲक्सेंचर (१४९) या नामांकित कंपनीत मास रिक्रुटमेंट करण्यात आली. तसेच रोजगाराच्या संधी दिलेल्या काही आय. टी. प्रॉडक्ट कंपन्या मध्ये डेटा इनसाईट (३६ लाख), बीएनवाय मेलॉन (१८.६४ लाख), द्रुवा सॉफ्टवेअर (१७ लाख), वेरीटास (१६ लाख) यांचा समावेश आहे. त्याच बरोबर रोजगाराच्या संधी दिलेल्या काही कोअर मॅन्युफॅक्चरींग कंपन्या यामधे मर्सिडीज बेंझ, डसॉल्ट सिस्टिम्स, व्हर्लपूल, एटलस कॉपको, गोदरेज, मिंडा, अल्फा लावल यांचाही समावेश आहे.पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट सेल दर वर्षी विध्यार्थ्यांना सुमारे ३५० नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी उपलब्ध करून देते. पीसीईटीचे आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज ६१ लाख (उबेर) आहे हे अभिमानास्पद आहे. यावर्षी ५८४ विद्यार्थ्यांना वार्षिक ७ लाख रुपये पेक्षा अधिक पगाराच्या नोक-या मिळाल्या आहेत. १०५७ विद्यार्थ्यांना वार्षिक ५ लाख रुपये ते ७ लाख रुपये; ४३२ विद्यार्थ्यांना ३.५ लाख रुपये ते ५ लाख रुपये पर्यंत आणि ९७ विद्यार्थ्यांना ३.५ लाखापेक्षा कमी वार्षिक पगाराच्या अशा एकूण २,१७० विद्यार्थ्यांना यावर्षी नोक-या मिळाल्या आहेत.

Google Ad

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी, डॉ. विलास देवतारे, डॉ. अपर्णा पांडे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.


पीसीईटी, नूतन व पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेल तर्फे डॉ. शीतलकुमार रवंदळे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. दीपक पवार, प्रा. विजय टोपे, प्रा. अनिकेत परदेशी, प्रा. हीना शर्मा, प्रा. ऐश्वर्या पाटील, मंगेश काळभोर, सर्व विभागातील ट्रेनिंग प्लेसमेंटचे शिक्षक प्रतिनिधी व ५०० हुन अधिक विद्यार्थी प्रतिनिधी यांनी योगदान दिले.
——————————————————————————————————
पीसीईटी व नूतन ग्रुपच्या विध्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्या पुढील प्रमाणे :
१) ७ लाखापेक्षा अधिक वार्षिक पगाराच्या नोकऱ्या ५८४;
२) ५ लाख ते ७ लाख वार्षिक पगाराच्या नोकऱ्या १०५७;
३) ३.५ लाख ते ५ लाख वार्षिक पगाराच्या नोकऱ्या ४३२;
४) ३.५ लाखापेक्षा कमी वार्षिक पगाराच्या नोकऱ्या ९७ अशा एकूण २,१७० नोकऱ्या मिळाल्या आहेत.
—————————————

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!