महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ०७ (भोसरी गावठाण) येथे गांधी जयंती निमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करून स्वच्छता ही सेवा या मोहिमेमध्ये शहरातील अनेक जण सहभागी झाले होते,’बैलगाडा शर्यत घाट,भोसरी’ येथे
राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची सुरुवात स्वच्छतेची शपथ “मी शपथ घेतो की मी दरवर्षी शंभर तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पना माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवेल ….” अशी शपथ घेतली गेली.
या वेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा किसनराव लांडगे साहेब, उल्हास जगताप (अतिरिक्त आयुक्त -३), रामदास तांबे साहेब (सह शहर अभियंता), राजेश आगळे (‘ इ ‘क्षेत्रीय अधिकारी ), सुधीर ठाकूर साहेब( ब्रिगेडियर, सीएमई), मा. प्रशांत जस्सल (कर्नल, सीएमई), मा. सोनल राजपूत (लेफ्टनंट कर्नल सीएमई),मा. दत्ता साहेब (लेफ्टनंट कर्नल, सीएमई), राजेश भाट साहेब( सहायक आरोग्य अधिकारी ) मा.नगरसेवक संतोष लोंढे, नितीन लांडगे ,सोनाली ताई गव्हाणे , नम्रता लोंढे, राजेंद्र लांडगे, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, बेसिक झोनल इन्चार्ज स्नेहल गोरे हे उपस्थित होते.
सुमारे २०० सीएमई जवान, पोलिस कर्मचारी, बचत गटातील महिला, नागरिक,स्वच्छ्ता दूत,असे सुमारे ५०० नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन सुमारे 1.5 टन कचरा संकलित केला. पी.सी.एम.सी चे ब्रँड ॲम्बेसेडर कु. पुजा शेलार (शिवछत्रपती पुरस्कार विजेती) श्री.सुरेश डोळस साहेब (ज्येष्ठ सिनेकलाकार ) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली….
सदर कार्यक्रमात चहापाण्याची व्यवस्था “शून्य कचरा” या संकल्पनेत राबविण्यात आला असून प्लास्टिक बॉटल ऐवजी स्टीलचे ग्लास, डिस्पोजेबल कप ऐवजी काचेचे ग्लास व कप तसेच डीस्पोजेबल प्लेट ऐवजी स्टीलच्या प्लेट वापरण्यात आल्या होत्या. यावेळी उपस्थित सन्माननियांचा सत्कार पुष्पगुच्छ ऐवजी शोभिवंत फुलांचे रोपटे देऊन करण्यात आला.
– शहरामध्ये निर्जंतुकीकरण करुनच पाणीपुरवठा; कोणतीही फिल्टर मशीन बंद नाही ! – नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ जानेवारी : राज्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'चं थैमान वाढत असल्याचं पाहायला मिळत…
महाराष्ट्र 14 न्यून, दि. २८ जानेवारी : ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक -26 जानेवारी 2025) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…