Categories: Sports

११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात हाॅकी पंजाबने हाॅकी उत्तरप्रदेशवर शूटआऊटमध्ये २-१ अशी मात करत पटकावले सुवर्णपदक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ डिसेंबर) : ११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात हाॅकी पंजाबने हाॅकी उत्तरप्रदेशवर शूटआऊटमध्ये २-१ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. तर उपविजेता ठरलेला हाॅकी उत्तरप्रदेश संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. तिस-या स्थानासाठी कर्नाटक विरुध्द महाराष्ट्र यांच्यात लढत झाली, यामध्ये कर्नाटकने महाराष्ट्राचा ३ गोलाच्या फरकाने पराभव करत कांस्य पदक पटकावले. विजेत्या संघास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ च्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्राम स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, शहर सुधारणा समिती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती माधवी राजापुरे, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, माजी ऑलिम्पियन हॉकी खेळाडु विक्रम पिल्ले, नगरसदस्या अपर्णा डोके, सुजाता पालांडे, अश्विनी जाधव, शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, हॉकी इंडियाचे सहसचिव फिरोज अन्सारी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनिष आनंद, सरचिटणीस मनोज भोरे, सहशहर अभियंता सतिश इंगळे, संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेची सांगता महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago