रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०८ऑगस्ट) : रयत विद्यार्थी विचार मंच संस्था ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता व  शैक्षणिक मदती करिता सातत्याने कार्यरत आहे.संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 07 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,कामगार भवन शेजारी पिंपरी येथे  दहावी  व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .

       सदर कार्यक्रमासाठी व विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे  अतिरिक्त आयुक्त.3 मा.उल्हास जगताप साहेब तसेच पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस उपायुक्त परिमंडळ.1 मा.मंचक इप्पर साहेब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड साहेब  हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तसेच  रयत विद्यार्थी विचार मंच  संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते . या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी ६० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले कि रयत विद्यार्थी विचार मंच  हि संकल्पना विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना मदत व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे . आजचा विद्यार्थी उद्याचा देश घडवणारा घटक आहे त्यांचा सन्मान करून त्यांना देशाच्या प्रगतीच्या प्रवाहात घेणे हाच उद्देश आहे .

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप – विद्यार्थी हा देशाचा पाय आहे ,आर्थिक परिस्थिती मुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहूनयेत यासाठी महानगरपालिकेने अनेक योजना केल्या आहेत त्याचा लाभ विद्यर्थ्यांनी घेतला पाहिजे , उपलब्ध साधनांद्वारे आपण प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळवता येते ,विद्यार्थ्यांनी चांगले मित्र निवडावे आणि व्यसनापासून दूर राहून प्रगती करावी .

पोलीस उप आयुक्त मा. मंचक इप्पर – प्रचंड इच्छा शक्ती असेल तर विद्यार्थी आपले करिअर  घडवू शकतो ,विद्यार्थ्यांनी आपले ध्येय उच्च ठेवून मार्ग क्रमण करून आपले ध्येय  गाठले पाहिजे . विद्यार्थ्यांनी कंफर्ट झोन मधून बाहेर निघून जिद्दीने ध्येयाचा ध्येय वेडे होऊन पाठलाग करावा. वेळेचे योग्य नियोजन करून ज्ञानर्जन करावे.

जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड – यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला संधी मिळते आपण त्या संधीच सोन करणं आपल्या हाती असत ,विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी कडे व्यसनाकडे वळून आपले भविष्य अंधारात ढकलू नये ,आपल्या कुटुंबाला ,देशाला अभिमान वाटेल असे कार्य विद्यार्थ्यांनी करायला .असे मत मान्यवरांनी व्यक्त केले व रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या .

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सुरुवात  करण्यात आली शाल ,पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचे सन्मान करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रस्तावना महासचिव संतोष शिंदे ,सूत्रसंचालन प्राजक्ता गायकवाड ,आभार प्रगती कोपरे ,संस्थेची भूमिका अभिजित साळुंखे ,विक्रांत शेळके यांनी मांडली . यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच  पदाधिकारी सदस्य मयूर जगताप ,अभिजित साळुंखे ,समाधान गायकवाड , अभिजित लगाडे ,प्रीतम वाघमारे ,अतुल वाघमारे , विक्रांत शेळके ,योगेश कांबळे ,रोहित कांबळे , नीरज भालेराव ,महेश गायकवाड ,गाझी शेख ,राहुल थोरात ,करणं शिंदे ,प्रमोद लोंढे ,आकाश गुंजाळ , किरण ओपले ,अजय यादव ,सागर गायकवाड ,भाग्यश्री आखाडे ,प्रगती कोपरे ,माधवी खरात ,प्राजक्ता गायकवाड , प्रतिभा बनसोडे , त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर अकील मुजावर ,गुलाम मोहंमद शेख , फैयाज शेख , राम भंडारी , विनोद गायकवाड,रवी कांबळे , नितीन ओव्हाळ ,चंद्रकांत बोचकुरे , नितीन गवळी , विकास गायकांबळे , प्रसाद गायकवाड ,यासिन मणेरे  इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते .

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

12 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

13 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

23 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

23 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago