Google Ad
Editor Choice

नवी सांगवीतील युवा उद्योजकाने वाढदिवसाचा खर्च टाळून … युवा पिढीला घालून दिला नवा आदर्श!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि २३ डिसेंबर) : वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत नवी सांगवीतील युवा उद्योजक संदीप दरेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत भंडारा डोंगरांवर साकारत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरास ११ हजारांचा धनादेश भंडारा डोंगर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशिद महाराज यांच्याकडे सुपुर्द करत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.

या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून संदीप दरेकर यांच्या या उपक्रमातून वेगळी प्रेरणा आजच्या तरुण पिढीला मिळत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Google Ad

आपल्या सहकारी मित्रांना व इतर सहकार्‍यांना बरोबर घेऊन ते नेहमीच समाज कार्यात अग्रभागी असतात, त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप, उद्योजक विजूशेठ जगताप, गणेश सोनवणे, गणेश बनकर, शशिकांत नागणे, राजू मोरे, प्रवीण पाटील, साई कोंढरे, साईश कोकाटे उपस्थित होते. यावेळी सामाजिक, राजकीय, उद्योग आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संदीप दरेकर यांना शुभेच्छा दिल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!