Categories: Editor Choice

तुझ्यात दम नाही … असे म्हटल्याने प्रेयसीची चाकूने सपासप वार करून हत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मे) : तुझ्यात दम नाही..! असे म्हटल्याचा राग आल्याने एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीच्या पोटावर चाकूने सपासप वार करून व गळा चिरून तिची हत्या केली आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात ही घटना घडली असून या आरोपीला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे व गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई यांनी 12 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या माहिम स्थानकाजवळ सकाळी 9च्या सुमारास ट्रॅकवर एका गोणीत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेच्या मारेकऱ्याचा शोध सुरु झाला.

मृतदेह मिळालेल्या गोणीवर इंग्रजीत HARI OM DRUG GOREGAON असे मार्किंग होते. त्यावरुन एक पथकास गोरेगाव परिसरात रवाना करण्यात आले. या तपासा दरम्यान दिंडोशी पोलीस ठाण्यात एक महिला हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहीती मिळाली. सारीका दामोदर चाळके (30) असे या महिलेचे नाव असून ती गोरेगाव पूर्वच्या संतोषनगर येथे राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी या महिलेच्या पतीची चौकशी केली असता ही महिला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता गोरेगावच्या सॅटेलाईट टॉवर येथे कामाला गेल्यानंतर घरी परतलीच नसल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यावरून सॅटेलाईट टॉवर मध्ये हाऊस किपिंगचे काम करणारा आरे कॉलनी येथे राहणार आरोपी विकास जगन खैरनार याच्यावर संशय आला. यावेळी त्याने चौकशीत सदर गुन्हा केल्याचे कबुल केले.

या प्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुंबईच्या पश्चिम परिमंडळ लोहमार्गचे पोलीस उप आयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, आरोपी विकास आणि सारीका हे सॅटेलाईट टॉवर मध्ये हाऊस किपींगचे काम करायचे. त्यांचे प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला. यावेळी सारिकाने विकासाला तुझ्यात दम नाही..! असे म्हटले. याचा गोष्टीचा विकासला राग आला.

हा राग मनात ठेऊन त्याने दिनांक 23 मे रोजी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान सॅटेलाईट टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयामध्ये तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने आरोपीने महिलेचा मृतदेह प्लॅस्टीकच्या गोणीत कोंबुन तो कचरा असल्याचे भासवून टॉवरच्या बाहेर काढला. यानंतर तो मृतदेह रिक्षाने गोरेगाव रेल्वे स्टेशनवर आणून तेथुन चर्चगेट स्लो लोकलमध्ये चढविला आणि माहीम ते माटुंगा दरम्यान ट्रेनमधून फेकला. हा आरोपी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात असून. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago