Google Ad
Uncategorized

चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे पदाधिकारी यांच्या वतीने औंध जिल्हा रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे पदाधिकारी यांच्या वतीने सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या उपक्रमात रुग्णालयातील परिचारिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

सदर उपक्रमात परीचारिकांसाठी क्रिकेट, कबड्डी, खो-खो, धावणे आदी मैदानी स्पर्धा खेळाचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धेत तयार करण्यात आलेल्या विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल तयार करण्यात आले होते. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांनी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.
दरम्यान जागतिक परिचारिका दिनानिमित्त सप्ताह सुरू असलेल्या या विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. मैदानी खेळात तसेच पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

Google Ad

कार्यक्रम प्रसंगी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला उपस्थितांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून परीचारकाकडून रुग्णसेवेची प्रतिज्ञा घेण्यात आली. या वर्षीचा मानाचा फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार अधिसेविका मंगला जाधवर यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना संदेश धामणेकर तर सूत्रसंचालन सचिन थोरात यांनी केले. याप्रसंगी माजी नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ देविदास शेलार, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, हिरेन सोनवणे, गणेश ढोरे, मनीष रेडेकर आदी मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन परीचारकांना सन्मानित केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!