Google Ad
Editor Choice

जिल्हा रुग्णालय, औंध पुणे येथे जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि १० ऑक्टोबर) : १० ऑक्टोंबर २०२२ जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित जिल्हा सामान्य रुग्णालय औंध येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमास मा . जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . अशोक नंदापुरकर , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . वर्षा डोईफोडे , मानसोपचार विभाग प्रमुख डॉ . मधुमिता बहाले मेट्रन मॅडम , मानसिक आरोग्य विभाग आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

कार्यक्रमाची प्रस्तावना मानसोपचारतज्ञ व कार्यक्रम अधिकारी डॉ . नेहा कोडे यांनी केली . मानसिक आजार tat P म्हणजे काय त्याची कारणे आणि त्यावर उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन त्यांनी उपस्थित समुदायाला केले . तसेच डॉ . अशोक नादापुरकर यांनी मानसिक आरोग्य उपलब्ध सुविधा आणि शासकीय उपाययोजना या विषयी ENER सविस्तर मार्गदर्शन उपस्थित समुदायाला केले .

Google Ad

तसेच सदृढ मानसिक ओग्यासाठी प्रत्येकाने आपल्या वेळेचे ROOM नियोजन करून ताण कसा कमी करावा शिवाय योगा , शरारिक व्यायाम , मेडीटेशन , योग्य आहार , स्वतःच्या आवडीनिवडी जपणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले . त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय , पुणे अंतर्गत मानसिक आरोग्य सप्ताह दिनांक १७/१०/२०२२ पर्यंत आयोजित करण्यात येत आहे . यात विविध कार्यक्रम आरोग्य मेळावा , ताणतणाव व्यवस्थापन , पोस्टर प्रदर्शन व रांगोळी स्पर्धाचे आयोजन केले आहे .

सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री नंदु सातपुते मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता यांनी केले . सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसिक आरोग्य विभाग कर्मचारी तसेच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले . त्याचबरोबर उपस्थित रुग्ण व नातेवाईकांना माहिती पत्रक वाटण्यात आले आणि मानसिक आजाराविषयी जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!