Google Ad
Editor Choice

औंध जिल्हा रुग्णालय, पुणे येथे जागतिक कर्करोग जनजागृती दिन साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ नोव्हेंबर २०२२) : आज सोमवारदि.०७ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालय पुणे येथे जागतिक कर्करोग जनजागृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा नोडल अधिकारी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांनी कर्करोग जोखीम कारक घटक जसेकी – तंबाखू, दारू, धूम्रपान, सुपारी, मेदयुक्त पदार्थ, बार्बीकल अन्न, स्थूलपणा अश्या विषयांवर माहिती दिली. सोबतच कर्करोगाची धोक्याची लक्षणे सांगितली. डॉ. प्रेमचंद कांबळे, कान, नाक, घसा तज्ञ यांनी कर्करोग या आजाराबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर मा. डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. वर्षा डोईफोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष खिलारे, निवासी वैद्यकीय अधिकारी(RMO) आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, मौखिक आरोग्य कक्ष, असंसर्गजन्य रोग कक्ष यांनी मा. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!