Categories: Uncategorized

सुदाम शिंदेंनी तयार केलेल्या बेलूर मठाच्या प्रतिकृतीला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे पारितोषिक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० सप्टेंबर) : पिंपळे गुरव येथील सेवा निवृत्त कलाशिक्षक सुदाम शिंदे यांनी देवदार लाकडापासून हुबेहुब तयार केलेल्या बेलुर मठाच्या प्रतिकृतीला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे. या प्रतीकृतीस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांचं मुख्यालय असलेल्या या बेलूर मठाच्या रचनेत स्वामी विवेकानंद यांच मोठं योगदान आहे.

थोर विचारवंत सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या पर्यावरण हाच नारायण या तत्त्वज्ञानाने प्रेरीत होऊन कलाकार शिंदे यांनी थर्माकोलचा वापर न करता संपूर्ण कलाकृती ही देवदार लाकडात तयार केली आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी पिंपळे गुरव येथील लक्ष्मी नगर भागातील त्यांच्या निवासस्थानी नागरिक सामाजिक, राजकीय मंडळी भेट देत आहेत. सर्वधर्म समभाव आणि एकतेचे प्रतिक असलेली ही वैश्विक वास्तू असून त्याची प्रतिकृती कलाकार श्री. शिंदे यांनी प्रत्यक्षात पाहताही हुबेहुब साकारली आहे. १९७४ पासून ते कला क्षेत्रात आहेत. सीता अग्नी प्रवेश, दिलवाडा जैन मंदिर, ताजमहल, गणपती- परशुराम युद्ध, १६ फुट नटराज असे अनेक देखावे कलाकृती त्यांनी यापूर्वी तयार केले. त्यांच्या या कलाकृती पारितोषिक प्राप्त ठरलेल्या आहेत.

याच काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला होता. पिंपरी येथील जयहिंद हायस्कूल येथे ३६ वर्ष कला शिक्षक पदावर त्यांनी सेवा केली. त्या दरम्यान शिंदे यांना आदर्श कलाध्यापक जिल्हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्यातील कलाकार कला त्यांनी जिवंत ठेवली आहे.

या प्रतिकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. परिसरातील कलाप्रेमी मंडळी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर ही कलाकृती पाहण्यासाठी शिंदे यांच्या घरी भेट देत आहेत.

*शंकर जगताप यांनी केले सुदाम शिंदेंचे कौतुक*
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप व स्थानिक नगरसेवक शशिकांत कदम यांनी देखील याबद्दल कलाकार शिंदे यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

बालपणापासून चित्रकला, मुर्ती व कोरीव कामाची आवड होती. सेवानिवत्तीच्या काळातही पुढच्या पिढीवर कला साधनेची ओळख व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बेलुर मठाची प्रतिकृती करण्यास सुरुवात केली. हे काम पूर्ण करायला दिड वर्ष लागली.
सुदाम शिंदे, कलाकार

Maharashtra14 News

Share
Published by
Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवडमध्ये जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद! ….- अवघ्या तीन दिवसांत ३५,००० हून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ५ मार्च २०२५ : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय…

18 hours ago

पिंपरी चिंचवड शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे स्वीकारले सदस्यत्व

शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ…

1 day ago

अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद पहिल्याच दिवशी ४८,७६३ जणांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…

6 days ago