Google Ad
Editor Choice

नाते जिव्हाळ्याचे … कार्य समृध्दीचे … ! आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा व उरो रूग्णालय सांगवी येथील विविध विकास कामाचे झाले भुमीपूजन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ऑगस्ट) : नाते जिव्हाळ्याचे … कार्य समृध्दीचे … ! चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगताप लक्ष्मण पांडूरंग यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा व उरो रूग्णालय सांगवी येथील ५१ लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे भुमीपूजन आज (दि.२९ ऑगस्ट) रोजी सकाळी ११.०० वा करण्यात आले.

यावेळी स्थानिक नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे, नगरसेविका सीमा चौगुले, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप,यी समिती मा.अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, डॉ प्रेमचंद कांबळे, डॉ नीलम दीक्षित, राजेश राऊत (प्रशासन अधिकारी), सविता दळवी (उपअभियंता पीडब्ल्यूडी)  अदिती निकम,अरुणा डोनोलिकार, कोमल गौंडाडकर, भाऊसाहेब जाधव, सतीश कांबळे, राजू नागणे, संतोष ढोरे, शहाजी पाटील, सुरेश शिंदे, प्रसाद देवकर, चंद्रकांत बेंडे, गणेश देवकर, रामदास पोखरकर, अभिमन्यु गाडेकर, सचिन महाडीक, रामदास गवळी, आप्पा पाटील, मोहन कांबळे, प्रविण जगताप, अभय नरडवेकर, पोपट भुजबळ, सुनील बोरसे, भालचंद्र तरटे, रामचंद्र देसाई, हरीश गायकवाड, संदीप नितनवरे, गणेश चौगुले उपस्थित होते.

Google Ad

▶️या कामांकरिता असा असणार निधी :

पुणे उरो रुग्णालय व जिल्हा रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे , रक्कम स . १५.०० लक्ष
– पुणे उरो रुग्णालय आँध येथील इमारतीच्या दर्शनी भागासमोरील ध्वजारोहण परिसराचे इटेलोकिंग पेव्हिंग लॉक बसविणे व तीन फुट उंचीची सीमाभिंत बांधणे . १० लक्ष रुपये,
– पुणे उरो रुग्णालय औंध येथील रुग्णालयीन दर्शनी भागासमोरील मोकळ्या जागेतील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे १०लक्ष रुपये
जिल्हा रुग्णालय पूर्व पाजूस नवीन प्रवेशद्वार व लोखंडी गेट बसविणे . रक्कम रु .५.०० लक्ष
पुणे उरो रुग्णालय औंध येथील रुग्णालयीन इमारती अंतर्गत मोकळ्या जागेवर रुग्णांच्या रक्कम रू .५.०० लक्ष

– नातेवाईकांना बसण्याकरीता प्रतिक्षा कक्षाचे बांधकाम करणे . जिल्हा रुग्णालय , ( सांगवी ) पूर्ण परिसरात अंतर्गत लहान मुलांसाठी खेळणी बसविणे , रक्कम रु .३.०० लक्ष
– जिल्हा रुग्णालय समोरील मोकळ्या जागेवर पार्किंगसाठी पहिंग ब्लॉक बसविणे . रक्कम रु .३.०० लक्ष ही कामे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधीतून करण्यात येणार आहेत.

या ठिकाणी असणाऱ्या रुग्णालयात राज्यातील विविध भागातून गोरगरीब नागरिक उपचारासाठी येत असतात, त्यांना होणारी अडचण पाहुन आमदार लक्ष्मण जगताप यांनी हे रुग्णालय स्थलांतरित करून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून जिल्हा रुग्णालयास नवसंजीवनी मिळवून दिली, आणि आज रोजी अनेक गोरगरिबांना येथे मोफत उपचार मिळत आहेत. तसेच रुग्णालयास अत्याधुनिक सर्व सोईयुक्त अशी कार्डियाक रुग्णवाहिका आपल्या विकास निधीतून आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली आहे.

आपल्या शहराचा चोहोबाजूंनी विकास होत असतानाच आरोग्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे, मग ते आरोग्य शिबीर असू , रुग्णांना मोफत जेवण, अपंगांना वेगवेगळी साधने, मोठमोठ्या ऑपरेशन करीता आर्थिक मदत आणि सहकार्य ते नेहमीच करत असतात. कोरोनाच्या संकटात तर त्यांनी आपल्या मतदार संघात आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना मोफत जेवणही पुरविले. त्यामुळे आजही त्यांचे ‘नाते जिव्हाळ्याचे आणि कार्य समृद्धीचे …! असल्याचा प्रत्येय परिसरातील नागरिकांना येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!