पिंपरी चिंचवड ईव्ही सेल आणि आर.एम.आय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व प्रमुख तीनचाकी ईव्ही इकोसिस्टम कंपन्यांसह ऑटो क्लस्टर चिंचवड येथे सहयोगी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ई-ऑटो इंन्सेटिव्ह स्कीमचा आढावा घेण्यासाठी आणि शहरात इलेक्ट्रिक ऑटोरिक्षांचा अवलंब करण्यात येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे तसेच शहरातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी बाबा कांबळे,नितीन पवार यांचेसह इतर रिक्षाचालक तसेच काही महिला रिक्षा चालकही उपस्थित होत्या.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले रिक्षाचालकांच्या समस्यांचे आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी पालिकेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल तसेच महापालिकेच्या वतीने ई-रिक्षा घेण्यासाठी चालकाला ३० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सीएनजी ऑटोच्या तुलनेत इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाकडे जाण्याच्या तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक परिणामांबद्दल रिक्षा संघटनांना जागरूक करणे हा या बैठकीचा उद्देश आहे.
या बैठकीत इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाच्या आर्थिक व्यवहार्यता आणि इलेक्ट्रिक ऑटोकरिता भविष्यात वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. शहरामध्ये इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांना बँक तसेच आर्थिक संस्थांकडून करण्यात येणाऱ्या वित्तपुरवठ्याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी ई-ऑटो प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये अनेक ओ. ई. एम, फ्लीट एग्रीगेटर, इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा विक्रेते, रिक्षाचालक संघटना आणि ई-ऑटो खरेदीसाठी तसेच चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग कंपन्यांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या संस्थांनी त्यांच्या उत्पादनांचे सादरीकरण केले आणि उपस्थितांना त्याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केले तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणाऱ्या ईव्ही प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली. आयुक्त शेखर सिंह यांनी आर्थिक संस्था, रिक्षा-मालक आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…