Google Ad
Editor Choice

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या यशस्वी मध्यस्थीने … सेक्टर २३ ते डांगे चौक परिसरातील पाण्याच्या पाईपलाईनचे रखडलेले काम मार्गस्थ…!!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०जुलै) : पिंपरी-चिंचवड मनपाच्या सेक्टर क्रमांक २३ जलशुद्धीकरण केंद्र पासून ते डांगे चौकापर्यंत जाणाऱ्या साडेसात किलोमीटरच्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम वाल्हेकरवाडी येथील शेतकरी  वाल्हेकर व इतरानी  मनपा सोबत  जमीन मोबदल्याकरिता अडवले होते.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले हे काम आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सदर शेतकऱ्याना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूसंपादनाबाबतचा व शेतकऱ्यांच्या समस्याचा विषय मार्गी लावून तातडीने काम करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या श्रीयुत लडकत व इतर  अधिकाऱ्यांना दिले.

Google Ad

अनेक वर्षापासून उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील पिंपळे सौदागर ते वाकड परिसरात अनियमितपणे व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाणीपुरवठ्याच्या वाहिनीचे उर्वरित काम युद्धपातळीवर करून पाण्याची लाईन चार्ज करून सदर परिसरातील नागरिका ना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध येत्या १५  ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्ये पूर्वी सुरळीत करून देण्याचे ग्वाही दिली माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या समक्ष जागेवर जाऊन शेतकरी,मनपा प्रशासन,पाणीपुरवठा विभाग व काम करणाऱ्या यंत्राने ची योग्य ती सांगड घालून काम सुरू करून दिल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर व वाकड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

54 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!