Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

शेखर चिंचवडे युथ फाउंडेशच्या वतीने जागतिक डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टरांचा सन्मान आणि डॉक्टरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न … !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जुलै) : कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता शहरात अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे !! सलाम तुमच्या सेवाव्रती कार्याला !!

१ जुलै जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फौंडेशन यांच्या ३११ देशी झाडांचा वृक्षरोपण सप्ताह या संकल्पनेअंतर्गत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि यांच्या पुढाकाराने डॉक्टर्स डे च्या दिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १७ मधील सेवाव्रती डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला, यावेळी प्रत्यक्ष सन्माननीय डॉक्टरच्या हस्ते देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

Google Ad

यावेळी सर्व डॉक्टर बंधू भगिनींना आगळी वेगळी भेट शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांचेकडून देण्यात आली, सर्व डॉक्टर्सना अंध बांधवानी तयार केलेले सीड बॉल्स वृक्षसंवर्धनसाठी भेट देण्यात आले.

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रो. शेखर बबनराव चिंचवडे, रोटरी चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रदीप वाल्हेकर, रो. सोमनाथ हारपुडे विद्यमान प्रेसिडेंट रो. सचिन खोले, विद्यमान सेक्रेटरी सौ. वनिता सावंत, माजी प्रेसिडेंट रो. सचिन काळभोर यांच्यासमवेत रो. सुभाष वाल्हेकर, रो. गणेश बोरा, रो. रुपेश मुनोत,रो. वसंत ढवळे, तसेच श्री. कोल्हे काका, श्री. सावंत साहेब, श्री नाना दिवाने, श्री. विशाल वाणी आदी मान्यवर उपस्थित होते

Google Ad

About the author

Maharashtra14 News

169 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!