Google Ad
Editor Choice

शिवसेनेचे टेन्शन वाढले …सुरतेतील झटक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप होणार ? शिंदे आणि गुजरातच्या भाजप नेत्यामध्ये खलबतं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : विधान परिषदेच्या निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असा तर्क हवेत वाटत होता. परंतु एकनाथ शिंदेच्या गायब होण्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार हे निश्चित होऊ लागलं आहे.

राज्यातील या संभाव्य राजकीय भूकंपाचे केंद्र गुजरातमधील सूरत असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे सुरतेत दुपारी पत्रकार परिषद घेणार असून त्यात मोठा निर्णय घेण्याची आणि आपल्या गायब होण्याची कारणे सांगणार आहेत.

Google Ad

दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि 11 आमदार सध्या सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि 11 आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या हॉटेलबाहेरील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचा एक मोठा नेता यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली.या बैठकीनंतर हा भाजप नेता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेतील धुसफूस बाहेर
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे.▶️शिंदे घेणार टोकाची भूमिका?
गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!