Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : चिकन मटण दुकानं रविवारी उघडणार का ? आंब्यांचं काय ? खवय्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज : रविवारचा दिवस असल्यामुळे अनेक जणांना मांसाहाराचे वेध लागले आहेत. मात्र राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादल आहेत. त्यामुळे चिकन मटण पोल्ट्री आणि इतर दुकानं वीकेंडला उघडी राहणार का? असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडला आहे. लोकांच्या मनातील प्रश्नांवर राज्य सरकारकडून खुलासा करण्यात आला आहे.

▶️प्रश्न : राज्यात चिकन मटण पोल्ट्री आणि इतर शॉप वीकेंडला उघडे राहणार का? आणि याच्याची संलग्न मालाच्या वाहतुकीवर काही बंधने आहेत का?
उत्तर : हो. चिकन मटण पोल्ट्री आणि इतर अन्न संलग्न दुकाने आठवड्याचे सातही दिवस खुली राहणार आहेत. त्याची वेळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर वैयक्तिक होम डिलीव्हरीला परवानगी असेल. 7 ते 11 या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास ऑर्डर नुसार दंड भरावा लागेल. माल वाहतुकीला काहीही बंधन नाही

Google Ad

▶️प्रश्न : आंब्याची दुकाने सकाळी 11 नंतर चालू राहू शकतील का? या वेळेनंतर प्रक्रिया आणि क्रमवारी लावणे याबाबत काय?
उत्तर : 7 ते 11 मध्ये दुकाने सुरु राहू शकतील. सकाळी 11 वाजल्यानंतर होम डिलीव्हरीला परवानगी असेल. माल वाहतुकीला कुठलेही बंधन नाही. ग्रेडिंग, पिकवणे आणि विभागीकरणाला 11 नंतर परवानगी आहे.

कोव्हिड संबंधी नियम पाळा
चिकन, मटण, अंडी, आंबे, इतर भाजीपाला आणि फळं खरेदी करताना नागरिकांनी कोव्हिड संबंधी नियमांचं उल्लंघन करु नये, असं आवाहन केलं जात आहे. डबल मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका, अंतर ठेवून रांगेत उभे राहा, हातात स्वच्छ धुवा, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे.

▶️राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची मागणी

राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांनी चिकन आणि अंडयाची दुकाने दिवसभर सुरु ठेवावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवल्यास कोरोनाग्रस्तांना चिकन तरी नीट खाता येईल, अशी भावना पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित नागरिकांच्या नातेवाईकांची आहे. चिकनची दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याबाबत अजित पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी रमेश थोरात यांनी केली आहे.

▶️चिकनची दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याची मागणी का?

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना त्यांना पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या शनिवारी रविवारी जारी केलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे चिकन आणि अंडी दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. यामुळे या दोन दिवशी कोरोना रुग्णांना चिकन आणि अंडी मिळत नाहीत. तरी याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी या दोन दिवशी सुद्धा दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची गरज आहे. चिकन दुकानांच्या प्रश्नी पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवारांनी लक्ष घालावे, अशी मागणी माजी आमदार रमेश थोरात आणि राज्यस्तरीय पोल्ट्री असोसिएशन यांनी केली आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!