Google Ad
Editor Choice

कुष्ठपिडित लोकांच्या समस्या सोडविणार – खासदार श्रीरंग आप्पा बारणे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०५ जानेवारी) : राज्य सरकारकडून नव्याने दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची घोषणा केली त्यातूनच राज्यभरातील दिव्यांग बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावी यासाठी अपाल संघटनेच्या अध्यक्षा मायाताई रणवरे व महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेत निवेदन देण्यात आले.

त्यात प्रामुख्याने दिव्यांगांना नोकर भरतीत विशेष सवलत,नव्याने प्रस्थापित दिव्यांग मंत्रालयात महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेच्या किमान ४ सदस्यांची नेमनुक करण्यात यावी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरी उपलब्ध करून देण्यात यावे व संजय गांधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम वाढवून मिळावी यासह अन्य मागणीचे पत्र खा.श्रीरंग आप्पा बारणे यांना देण्यात आले.

Google Ad

सदर प्रकरणी या सरकारकडून आत्तापर्यंत घेण्यात आलेले सर्व निर्णय लोकहिताचे व राज्यातील जनतेच्या भल्यासाठीच घेतले असून दिव्यांग व कुष्ठपिडिताच्या प्रश्न सोडविण्यासाठी देखील हे सरकार कटिबद्ध असून त्यासाठी मा.मुख्यमंत्री साहेबांची भेट घेत कुष्ठपिडितांच्या सर्व समस्या जातीने लक्ष घालून सोडविण्याचे आश्वासन दिले त्याप्रसंगी पिंपरी युवासेनाप्रमुख निलेश हाके,महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण सचिव अशोक आंबेकर व हर्षल जाधव व अपाल संस्थेच्या अध्यक्षा मायाताई रणवरे उपस्थित होते.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!